आदर्श शिक्षकांच्या शिक्षक दिनी पुरस्कारांचा मुहूर्त टळला

आदर्श शिक्षकांच्या शिक्षक दिनी पुरस्कारांचा मुहूर्त टळला

दि ५ अमरावती
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षकदिनी सन्मानित करण्याचे निर्देश असताना यावर्षी मात्र आदर्श शिक्षकांची फाईल विभागीय आयुक्तांकडेच पडून आहे. त्यामुळे उद्या ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी आदर्श शिक्षकांना सन्मानापासून वंचित राहावे लागणार आहे..
जिल्हा परिषद दरवर्षी तालुकास्तरावर प्रत्येकी एक अशा १४ शिक्षकांना उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श पुरस्कार दिला जातो. याकरिता शिक्षण विभागाकडे २५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. तर २० शिक्षकांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यानंतर सदर फाईल मंजुरीकरिता विभागीय आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आली. परंतु या फाईलला अद्याप मंजुरात न मिळाल्याने आदर्श शिक्षकांना शिक्षकदिनी सन्मानापासून वंचित राहावे लागणार आहे. शिक्षकदिनी त्यांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करा, असे आदेश असताना दरवर्षीच मात्र प्रशासकीय अडचणीमुळे शिक्षकांना वेळेवर हा पुरस्कार दिल्या जात नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.