बालिकेचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षाचा सश्रम कारावास.

बालिकेचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षाचा सश्रम कारावास.

दि 4 अकोला प्रतिनिधी

अकोला मध्ये एका ११ वर्षीय बालिकेला चॉकलेट चे आमिष दाखवून तिच्या सोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला आज न्यायालयाने दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. सुनिल नंदलाल कैथवास अस आरोपीचे नाव असून शहरातील अकोट फाईल पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनयभंगाची घटना घडली होती. २१ ऑक्टोबर २०१४ रोजी आरोपी सुनील कैथवास याने एका ११ वर्षाच्या बालिकेला चॉकलेट चे आमिष देत तिचा विनयभंग केला होता. या घटनेची फिर्याद पीडितेच्या वडिलांनी अकोट फाईल पोलीस स्टेशनला दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत न्यायालयात चार्जशीट दाखल केली. या प्रकरनाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षाच्या वतीनं या प्रकरणात सात साक्षीदार तपासण्यात आले गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी सुनील नंदलाल कैथवास याला पोस्को ऍक्ट चे कलम 8 मध्ये तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तर 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी 2 महिण्याचा कारावासाची शिक्षा देण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने ऍड. आर.आर देशपांडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published.