बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उर्वरित बांधकाम करिता 64 लक्ष रुपये मंजूर

बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उर्वरित बांधकाम करिता 64 लक्ष रुपये मंजूर

जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांला अखेर यश

दि 4 वरुड प्रतिनिधी

वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद येथे 2010 ला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले परंतू या आरोग्य केंद्रा च्या बांधकामाची प्रत्यक्ष सुरूवात मात्र 2016 ला झाली.आरोग्य केंद्राच्या बांधकामात निधी अपुरा पडल्या मुळे 6 महिन्या पर्यंत काम बंद पडलेले होते.परंतु बेनोडा जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यानी वरांवर पाठपुरावा करून जिल्हा वार्षीक योजना सर्वसाधरण 2018-19 अन्तर्गत अमरावती जिल्ह्या करिता विविध योजना करिता अर्थसंकल्प नियतव्ययामधून 64 लक्ष रुपयेचा निधी बेनोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उर्वरित बांधकामा करिता मंजूर करण्यात आला आनी दवाखन्याचे बांधकाम युध्द पातळीवर सुरु असुन नोव्हेंबर महिन्यात काम पूर्ण करण्याचा मानस जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यानी व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यानी केला आहे

2210 वैद्यकीय सेवा व सर्व जनीक आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकाम व विस्तारीकरणासाठी जिल्हपरिषदाणा अधिक सहाय्य कार्यक्रम 2210 ई 061 व जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांच्या आनी जिल्हा आरोग्य अधिकारी जी प अमरावती यांच्या मागणी नुसार लेखा शिर्षक नियोजन विभाग क्र.ओ.74,2210 वैद्यकिय सेवा व सार्वजनीक आरोग्य,02,नागरी आरोग्य सेवा-ईतर वैद्यकीय पध्दती ,101 आउर्वेद,61 जिल्हा योजना अमरावती 61,05 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकाम व विस्तारीकरणासाठी जिल्हा परिषदेना सहाय्य कार्यक्रम 2210 ई 061,31 सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर 35,भांडवली मत्तेच्या निर्मिती करिता अनुदान या लेख शिर्शका खाली 64 लक्ष रुपये निधी बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उर्व्ररित रहलेले रोड,नाली,पेविंग ब्लॉक,गार्डन,ऑपरेशन थियटर च्या कामा करिता मंजूर करण्यात आले आनी सदर कामाला युध्द पातळीवर सुरुवात झाली असुन नोव्हेंबर महिन्यात पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचा मानस जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता तथा जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यानी केला आहे व सदर निधी जिल्हा नियोजन समिती यानी जिल्हा परिषद याना क्र,जिनीस/अम/नि,भवन/जिवायो 18-19 निधी वितरण 1106 ला दिनाक 7,6,218 ला वितरित करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published.