बुलढाणा जिल्ह्यातील किन्होळा येथील शेतात जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे 

बुलढाणा जिल्ह्यातील किन्होळा येथील शेतात जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे

दि 4 बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यात दरवर्षी उत्पन्नाची आकडेवारी संकलित करण्याकरीता पिक कापणी प्रयोगातंर्गत 20 टक्के गावांची निवड करण्यात आली आहे पिक विमा नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अशा या महत्वपूर्ण पिक कापणी प्रयोग करण्यात आला.चिखली तालुक्यातील किन्होळा येथील दिपक प्रल्हाद बाहेकर यांच्या शेतात जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे स्वत: उपस्थित राहील्या. केवळ पिक कापणी प्रयोगाची त्यांनी माहितीच घेतली नाही, तर शेतमजूर महिलांसोबत शेतीकामाचा अनुभवही घेतला.  

यावेळी दिपक बाहेकर यांच्या शेतामध्ये मूग तोडणीचे काम सुरू होते. जिल्हाधिकारी यांनी मूग तोडणीसुद्धा केली. जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी शेतमजूर महिलेच्या भूमिकेत जावून  त्यांचे आयुष्य जगण्याचा आनंद घेतला. शेती कामातील त्यांची आवड बघता तेथे काम करणाऱ्या महिलांनासुद्धा आश्चर्य वाटले. एक जिल्हाधिकारीसारखा उच्चपदस्थ अधिकारी आपल्या पदाचा कुठलाही अभिमान न बाळगता, अधिकारी पदाचा बडेजाव न करता साध्या पद्धतीने शेतमजूरासारखे काम करतो. हे बघून शेतमजूर महिला अचंबित झाल्या. त्यांनीही  जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांच्यासोबत संवाद साधला. मूग तोडणीचे काम कशाप्रकारे केल्या जाते याबाबत माहिती दिली.

याप्रसंगी शेतात ग्रामस्तरीय समिती, शेतकरी, सरपंच, विमा कंपनी प्रतिनिधी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.