इंधन दरवाढीच्या विरोधात मनसेचे ढोल वाजवा आंदोलन 

इंधन दरवाढीच्या विरोधात मनसेचे ढोल वाजवा आंदोलन 
– देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असतांना सरकार मात्र दरवाढ रोखण्यासाठी कुठलेच प्रयत्न करीत नसल्याने सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. रोज होत असलेल्या या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज अमरावती शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपा समोर ढोल ताशे वाजवून आंदोलन केले. मनसेच्या अमरावती शहर कार्यकर्त्यांनी इर्विन चौक येथील एका पेट्रोल पंपावर पदयात्रा काढली व ढोल ताशे वाजवून भाजप सरकारचा निषेध केला. आज अमरावती शहरातील पेट्रोलचे दर ८८ रुपयांवर पोचले असून सर्व सामान्य जनता या महागाईने होरपळून गेली आहे. मात्र केंद्र व राज्य सरकार हि दरवाढ रोखण्यसाठी कुठलेच उपाय करीत नसल्याचा आरोप यावेळी मनसे  कार्यकर्त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published.