आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रयत्नाला यश लवकरच मीरा-भाईंदर शहरात साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे बायो डायव्हर्सिटी पार्क….

आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रयत्नाला यश लवकरच मीरा-भाईंदर शहरात साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे बायो डायव्हर्सिटी पार्क….

मुंबई: – मीरा भाईंदरमध्ये बायो डायव्हर्सिटी पार्क उभारण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत… 120 कोटी रुपयांच्या या पर्यटन प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरित करण्याबरोबरच प्रशासकीय मंजुरी त्वरित देण्याच्या सूचना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी प्रशासनाला दिल्या आहेत…

देशभरातल्या पर्यटकांच्या पसंतीला उतरेल असे बायो डायव्हर्सिटी पार्क मीरा भाईंदर महापालिका आणि पर्यटन विभाग एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्या संदर्भात शुक्रवारी मंत्रालयात पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता आदींसह जिल्हा प्रशासन, महापालिका आणि एमटीडीसीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते…

जिल्हा प्रशासना तर्फे या प्रकल्पाला 31 हेक्टर जमीन देण्यास संमती देण्यात आली आहे… महापालिका, राज्य सरकारच्या निधीतून इथे थीम रिसॉर्ट, सी फेस हॉटेल, आर्टिफिशियल लेक, बटरफ्लाय पार्क, योग केंद्र सह अनेकविध मनोरंजन, पर्यटन प्रकल्प इथे उभारले जाणार आहे… समुद्र किनारा, जवळ असलेले एस्सेल वर्ल्ड आदींमुळे हे बायो डायव्हर्सिटी पार्क देशभरातील पर्यटकांना एक नवं डेस्टिनेशन म्हणून उपलब्ध होणार आहे.

मंत्रालयात झालेल्या बायो डायव्हर्सिटी पार्क संदर्भातल्या बैठकीत चर्चा करतांना पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता आदींसह अधिकारी